Let’s work in the field of technology at full capacity to do something that will be remembered in history!
प्रयोगातून विज्ञान प्रशिक्षण" अंतर्गत दोन दिवसांची सौ विमलाबाई गरवारे शाळेतील विद्यार्थ्यां साठी कार्यशाळा*
आज पासून सुमारे दीड महिन्यानंतर सौ विमलाबाई गरवारे शाळेतील 30 विद्यार्थ्यांकरिता *दोन दिवसांच्या रोबो कार्यशाळेचे* आयोजन करीत आहे.
*या 15 रोबो किट साठी सुमारे ₹40,000/-खर्च खर्च येइल*.
परंतु या रोबो किट मधून वेगवेगळे 20 रोबो तयार करता येतील त्या मुळे हा कार्यक्रम वर्षभर चालवीता येईल व शेवटी ही किट शाळेला भेट देण्यात येतील. या साठीचा सर्व खर्च प्रयोगातून विज्ञान प्रशिक्षण अंतर्गत जमलेल्या निधीतून केला जाईल
ही कार्यशाळा *श्री उदय ताडे* घेतील. श्री ताडे सध्या अशा कार्यशाळा NDA खडकवासला येथील कॅडेट साठी घेतात. त्यांनी त्रिवेंद्रम जवळील इसरो च्या थुम्बा येथे डॉ अब्दुल कलाम व वसंतराव गोवारीकर यांच्याबरोबर काम केलेले आहे. तसेच पुण्यातील C-Dac च्या *परम संगणक* निर्मितीत महत्वाचे काम केलेले आहे
हे Arduino Uno तंत्रज्ञानावरील रोबो विद्यार्थी किट पासून तयार करतील व ते ब्लूटूथ तंत्रज्ञानाने मोबाइल फोन द्वारे कार्यान्वित केले जातील.
याची आज्ञावली शिकविल्या नंतर 8 वी तील विद्यार्थी सहज पणे बदलू /लिहू व कार्यान्वीत करू शकतील.
रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे प्रार्थमिक शिक्षण व आवड निर्माण करण्या करिता ही कार्यशाळा अतिशय उपयोगी पडेल.
काही विद्यार्थी या क्षेत्रात आपले पुढील करिअर करू शकतील